ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून कॅरम स्पर्धा संपन्न

माध्यमातून कॅरम स्पर्धा संपन्न अंबरनाथ दि. १३ / प्रतिनिधी :- येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, अंबरनाथच्या माध्यमातून स्व. शांताराम जाधव सभागृहात गलाबराव करंजल पाटील प्रतिष्ठानच्या सहकार्याने कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कॅरम स्पर्धेत सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. पार पडलेल्या कॅरम स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आयोजित व गुलाबराव करंजले पाटील प्रतिष्ठान पुरस्कृत कॅरम दुहेरी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, प्रथम क्र. किरण एडेकर व शिवशंकर गायकवाड, द्वितीय क्र. बाळू वडवे व प्रदीप पेडणेकर आणि तृतीय क्रमाक राजा देशपाडे व दुरवे यांन पटकावला आहे. तर उत्तेजनार्थ शिवशंकर लाला व सुदाम गायकवाड या विजेत्यांना देण्यात आले. या कॅरम स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढावा व त्यांना खेळाचा आनंद घेता यावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. वरील सर्व खेळाडूंचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवशंकर गायकवाड यांनी अभिनंदन केले.