उल्हासनगरात १५ फेब्रुवारीला साकारतोय रोटी डे..

 उल्हासनगर, दि. १३ / प्रतिनिधी : जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती ही अत्यंत आदर्श मानली जाते. परंतु अलीकडच्या काळामध्ये पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण फार मोठ्या प्रमाणात होतंय.. सध्या व्हॅलेंटाइन सप्ताह जोरात सुरू आहे. यानिमित्ताने विविध डेज साजरे होतायेत. परंतु, या भाऊगतिही सोनु विशनानी आणि बादल धर्मानी नवा पायंडा पाडु पाहत आहे. वॅलेंटाईन सप्ताह संपल्याच्या दुसर्या दिवशी १५ फेब्रुवारीला रोटी डे साजरा करुन चंगळवादी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन भरत आहेत.



चॉकलेट डे, चुंबन डे, रोज डे, हग डे, टेडी बेअर डे अशासारख्या प्रेम व्यत्त करण्याऱ्या पाश्चात्य संस्कारांचा शिरकाव भारताच्या नव्या पिढीत होतोय. परंत या प्रथेला फाटा देत उपाशी पोटाला अन्न देण्याचं पुण्यकर्म करण्याचं काम रोटीडे साजरा करून उल्हासनगरमधील काही युवकांनी हाती घेतले आहे. पुजा पंजवानी, बादल । धर्मानी आणि टिमने चार वर्षांपासन वलेटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी रोटी डे चे आयोजन हाती घेतले आहे. दरवर्षी चार , युवा गरीब झोपडपट्टी वसाहतीत _जाऊन उपाशी लोकांना भाकरी . आणि जेवण वाटण्याचे कार्य करीत आहेत.यावर्षी ही झालेल्या अतिवृष्टी, किंवा कोणतेही आंदोलन मोर्चा च्या वेळी उल्हासनगरात या टिमने महत्वाची भुमिका पार पाडली. तर नुकतीच झाले ली मलंगगड यात्रेतील बंदोबस्तात असलेल्या१५०० पोलिसांना दहा दिवस सकाळी संध्याकाळी जेवणाची तजवीज केली होती. परंतु, त्यांनी आपले हे पुण्यकर्म आज पर्यंत प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे टाळलंय. यावर्षी थायरासिंग दरबार या गुरुद्वार्याशी सलग्न सेवेकरी सोनू विशनानी यांनी या तरुणांच्या मदतकार्यात हातभार लावलाय. आता या तरुणांना आणखी युवा भेटतायेत येत्या १५ फेब्रुवारीला हि मंडळी आपापल्या घरुन यथाशक्ति जेवण आणुन हजारो गरजवंतांपर्यंत झोपडपटीत जाऊन वाटप करणार आहे याशी पोटाला चुंबन, गुलाब पेक्षा भाकरी द्यावी. तरुणाईनेही ईतर डेज साजरे करण्यापक्षा या उपक्रमाला हातभार लावण्याचे आवाहन सोनु विशनानी यांनी केले आहे.