प्रोत्साहन फाउडेशन प्रथम वर्धापन दिनानिमित्त मनोहर पाटकर यांना पुरस्कार प्रदान

ठाणे दि. १३ प्रतिनिधी :- प्रोत्साहन फाउंडेशन प्रथम वर्धापन दिनानिमित्त मनोहर पाटकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिनांक ०९/ ०२/२०२० रोजी विविध क्षेत्रात उत्कृष्ट उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान केला आहे. जळगावचे खासदार उन्मेष दादा पाटील व पद्मश्री निलिमाताई मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली, वर्धापन दिन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केले. मनोहर पाटकर हे इंग्रजी विषयाचे उत्तम मार्गदर्शक तज्ञ, ही श्रीमती सावित्री देवी थिराणी विद्यामंदिर शाळेत इंग्रजीचे शिक्षक म्हणून कार्यरत औरंगाबाद विद्यापीठात दहा दिवसाचे इंग्रजीचे ट्रेनिंग घेऊन आले. अतिशय हुशार, मेहनती, कृतीशील सहकार्याची भावना जोपासणारे हाडाचे शिक्षक होय. वर्तकनगर शिक्षण मंडळाच्या वतीने देविदास जोशी, स्वामी समर्थ साहेब, राजेंद्र आयरे इ. सर्व सन्माननीय व प्राचार्य संजय सहस्त्रबुद्धे सर, उपप्राचार्य दिलीप सागळे, पर्यवेक्षिका आशा गायकवाड, सर्व कर्मचारी, शिक्षकवृंद यांच्याकडून त्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन


.