अंबरनाथ दि. २५/ प्रतिनिधी :- देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा म महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर गलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व विश्वजीत-ऐज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रमदान व स्वच्छता अभियान अंतर्गत माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते गुलाबराव करजुल-पाटील, भाजपाचे पूर्व व पश्चिम मंडळ शहराध्यक्ष अभिजीत करंजले- पाटील. राजेश कौठाळे यांच्यासमवेत भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सोसायटी मधील रहिवाशांना परिसरात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवून “स्वच्छता हा धर्म'' जन संदेश दिला.असल्याचा मनोदय माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील यांनी स्वच्छता अभियानात सहभागी होताना व्यक्त केला. यावेळी भाजपच पदाधकारा दिलाप कणसे, नरसिमूल बोलबंडा, संतोष भोईर. विश्वास निंबाळकर लालमन यादव, देवेंद्र यादव, मनेष गुंजाळ,सुनील वाघमारे, संतोष वंदाल, आरती मेहता, यांच्यासह सोसायटीतील सर्व सभासदांनी आपल्या परिवारासह श्रमदानातू स्वच्छता अभियानात सहभागी होऊन राष्ट्रसंत गाडगे बाबांचा स्वच्छतेचा संदेश जनजागत केला. नुकत्याच झालेल्या महाशिवरात्री यात्रा निमित्त आलेल्या लाखों भाविकांच्या अंबरनाथ शहराच्या वतीने पाणीप्रसादाचे वाटप करण्यात आले. सत गाडगबाबा महाराज यांनी त्यांच्या जीवनात स्वच्छतेचा महामंत्र साऱ्या समाजाला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर योगातून आरोग्य आणि स्वच्छता हा धर्म देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. याची दखल घेऊन आज जगाचे भारताकडे लक्ष लागून राहिले आहे. स्वछता आपल्या दारी या कर्तव्यचे पालन करून आपला गाव, शहरपरिसर, नदी, ओढे, तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवाच
अंबरनाथमध्ये भाजपचे। श्रमदानातून स्वच्छता अभियान