उल्हासनगर दि. १३ प्रतिनिधी :- गोल्ड स्मगलरच्या | विरोधात बातमी लावल्यामुळे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या | मदतीने पत्रकारावर खंडणीचा गुन्हा हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल केल्याची बाब पोलिस उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी सदरच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस डे वर्ण्य केला आहे. महादेव केबलनेटचे व्यापारी नरेश रोहडा ह्याला त्याच्या कार्यालया समोरचं तीन जणांनी पत्रकार असल्याचे सांगत, आमच्या संघात धर्मेंद्र दूबे व दिलीप मिश्रा असून महिना ८०,०००/- रुपयांची मागणी केली. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश रोहरा हा गोल्ड स्मगलिंग करीत असल्याची आशंका व्यक्त करणारी बातमी धर्मेंद्र दुबे आणि दिलीप मिश्रा यांनी केलेल्या बातमीत व्यक्त केली होती. या बातमी नंतर दुबे याना नरेश रोहरा याने एका व्हाट्सए ग्रुपवर धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. महिन्याभरापूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनील शर्मा नामक गुंडाचे पाय हातोडा मारून तोडले होते. त्यावेळी सनील शर्मा याने आमदार कुमार आयलानी यांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगितले. तशी फिर्याद मध्ये नोंद असली तरी कुमार आयलानी याना आरोपी बनविण्यात आले नाही. असे असताना धर्मेंद्र दुबे याना बातमीचा आकस म्हणून आरोपी बनविल्याची बाब उल्हासनगरच्या पत्रकारांनी पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन मांडली. तसेच नरेश रोहरा दाखल असलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि त्याने हिललाईन पोलीस ठाण्यात समाजसेवक. सरकारी अधिकारी, पत्रकार यांच्या विरोधात दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याची माहिती पोलीस उपायुक्त शेवाळे याना दिली. तसेच विना चौकशी अश्याप्रकारे घटनास्थळी हजर नसताना ही पत्रकारांना आरोपी बनवून त्यांच्या पत्रकारितेवर गदा आणणारे असल्याचे मत शहरातील विविध पत्रकारांनी मांडले. हिललाईन पोलीस ठाणे हे गुंडाच्या इशाऱ्यावर चालत असल्याने ह्या गुन्ह्याचा तपास हिललाईन पोलीस ठाण्यात बाल पोलीस योगाने नाही सदरच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांच्याकडे सोपविला आहे.