- अंबरनाथ नगरपरिषदेच्या २०१८च्या सर्वसाधारण सभेने पूवेकडील स्टेशन लगत असलेल्या कै.य.मा.चव्हाण खुले नाट्यगृहातच बंदीस्त नाट्यगृह करण्याचे अकलेचे तारे तोडले आणि त्या ठिकाणी शासनाकडून परवानगी नाकारल्यानंतर अंबरनाथ शहरात असलेले कै.य.मा.चव्हण खुले नाट्यगृह खंडर झाले असून, जवळपास १० कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात आणि कमिशन मंजूर करणाऱ्यांच्या खिशात गेले आणि आपली इज्जत वाचावी म्हणून या खंडर जागेत दोन चाकी वाहनं पार्किगचे नाटक सुरु आहे. बंदिस्त नाट्यगृहाचा प्रयत्न फसल्यानंतर आता अंबरनाथ नगरपरिषदेचा मोर्च वळला आहे तो पश्चिमेकडील सर्कस मैदानावर. आता या सर्वस मैदानावर बंदिस्त नाट्यगृहाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, निविदाही काढण्यात आल्या आहेत. परंतु याच सर्कस मैदानत गेली २५ वर्षे भटके विमुक्त, डबरी, गोसावी, नागपंथी समाजाची ५३० कुटुंबे रहात आहेत. त्यांना बेघर करुन बंदिस्त नाट्यगृह बांधण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनास अतिघाई झालेली आहे. अशीच घाई करुन पूर्वेकडे वाट लावली आहे आणि आता पश्चिमेकडेही असाच प्रयत्न सुरु आहे. सदर भटके विमुक्त समाजाच्या कार्यकर्त्यांनी ना. विजय वडेट्टीवार, मंत्री मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्य्याकडे मदतीसाठी धाव घेतली. मंत्री महोदय ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, ठाणे व मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद यांना लेखी पत्रही दिले.
परंतु या कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्राला अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनाने कराचा टापला दाखवत त्याना सर्कस मैदान खाली करण्याची तस्ती लावली जात आहे. असे भटक्या विमुक्त समाजाचे प्रमुख कार्यकर्ते भीमराव इंगोले यांनी सांगितले. इतकेच काय त्यांना अभिलाषाही दाखविण्यात येत असल्याचे समजते. तेव्हा मंत्री महोदयांनी दिलेल्या पत्राचा आदर न करत एक मुख्याधिकारी त्या पत्रास नजर अंदाज करतो याची चौकशी व्हावी अशी मागणीही भटके विमुक्त समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. ५३० कटंबे रस्त्यावर आणण्याअगोदर नगरपरिषदेने त्यांच्या निवासची, निवाऱ्याची सोय करावी अशी मागणी होत आहे. जोपर्यंत आमच्या निवासाची व निवाऱ्याची सोय होत नाही तोपर्यंत । सर्कस मैदान सोडणार नसल्याचे तेथील भटक्या विमुक्त समाजाच्या बांधवांनी सांगितले. तेव्हा मा. मंत्री महोदयांनी याकडे लक्ष घालावे व कारवाईचा आढावा घ्यावा अशी मागणी होत आहे.