मुंबई दि. १। प्रतिनिधी :- दिल्लीमध्ये गेले चार दिवस सीएए कायद्यावरुन हिंसाचार झाला. गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली हिंसाचारासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. दिल्लीमधील हिंसाचार ही दंगल नसून हा हल्ला असल्याचे प्रकाश आबेडकर म्हणाले. दिल्लीतील हिंसाचार थांबला पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, आरएसएसच्या कार्यकर्त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. “काँग्रेसचे सरकार असताना काँग्रेसने आणि आता भाजपचे सरकार असताना भाजप सघाच्या कार्यकत्यांना से शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत आहे. याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कल जात आह असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दिल्ली हिंसाचारावरुन केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढणारे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली दिल्ली न्यायालयातून पंजाब आणि हरियाणा न्यायालयात केली. यावर सर्व पक्षांनी आणि संघटनांनी टीका केली आहे. दरम्यान, दिल्लाच मुख्यमत्रा अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारासंबंधी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, कैलाश आणि इतर अधिकारी गहलात आणि इतर आधकारा उपस्थित राहणार आहेत. याबैठकीत हिसाचारग्रस्त भागाताल लोकाना दिलासा देण्याबाबत चर्चा होणार आहे.
दिल्ली हिंसाचार दंगल नसून हल्ला -प्रकाश आंबेडकर