उल्हासनगरातील ५०० स्केअर फुट घरांची घरपट्टी होणार माफ!

उल्हासनगर, दि. २५ / प्रतिनिधी :- शहरातील ५०० स्केअर फट आतील क्षेत्रफळ असलेल्या घरांची घर पट्टी माफ करण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत सर्वांनमते मंजर करण्यात आला. यामळे सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पालिकेची आर्थिकस्थिति डबघाईला असतांना. तसेच मालमत्ता करा शिवाय उत्त्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसताना सत्ताधारी आणि प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वप्न की वास्तव अशी शंका सामान्य नागरीकांना भेडसावत - आहे. काही दिवसां पर्वी उल्हासनगर मनपात भाजपा - टिम ओमी कलानी - साईपक्षाची सत्ता होती. टिम कलानीने भाजपाला ला झटका दिल्याने सेनेची सत्ता आला. सेनेने मनपा निवडणूकी दरम्यान शहरातील जनतेला आश्वासन दिले होते की, ५ ० ०स्कअर फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांची घरपट्टी माफ करण्यात येईल. त्यानुसार सभागृह नेता आणि शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी संधी मिळताच महासभेत गरीबांची घरपदी माफ करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. मात्र सदर प्रस्ताव मांडतांना मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार करण्यात आला नाही. सद्दयस्थितीत महापालिका आर्थिक दिवाळ खोरीत आहे. ६०० कोटीरुपयांचं कर्ज आहे. ते फेडण्यासाठी पालिकेकडे एकमेव उत्पन्नाचं साधन मालमत्ता कर (घरपट्टी)वसूली. शासनाचं अनुदान वेळेवर मिळत नाही. ५००स्केअर फुट मालमत्तांच कर माफ करण्या बाबत ठोस निकष नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली असून हि करमाफी म्हणजे स्वप्न की वास्तव. हे येणारा काळच ठरवेल.