डोंबिवली, दि. २५ / प्रतिनिधी :- ‘जीवन जेव्हा इतरांसाठी जगले जाते तेव्हा ते महत्वपूर्ण बनते' या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वचनाला व्यावहारिक रुप देत त्यांच्या ६६व्या जयंती दिनी २३ फेब्रुवारी, २०२० रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने देशातील ४०० शहरांमधील तब्बल १३२० इस्पितळांची स्वच्छता केली. या अभियानामध्ये संत निरंकारी मिशनचे सेवादल, फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि सामान्य भक्तगण मिळून ३.५ लाख निरंकारी भक्तांनी भाग घेतला ज्याद्वारे जवळपास २१ लक्ष मनुष्य तास इतकी सेवा घडून आली.
या स्वच्छता अभियाना अंतर्गत डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर इत्यादी क्षेत्रातील १५ रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांसह ८ उद्यानांची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगरमधील सर्व सरकारी व महापालिका रुग्णालये यांच्यासह ८ उद्यानांचा समावेश आहे. स्वच्छता करण्यात आलल्या भागामध्य, डोंबिवली, ठाकुर्ली, गोग्रासवाडी, सोनारपाडा, कल्याण, द्वारली पाडा, विठ्ठलवाडी, उल्लासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, भिसोळ, मुरबाड, शहापूरकसारा, वाशिंद, भिवंडीब्राह्मणआळी, गायत्री नगर अशा विविध भागांचा समोवशआहे. या अभियानामध्ये संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनमधील सुमारे ३ हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला. त्यामध्ये निरंकारी सेवादल, संत निरंकिारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि सामान्य निरंकारी भक्तगणांचा समोवश होता. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक सकाळी ८.०० वाजता अनुशासनबद्ध रीतीने एकत्रित झाले. त्यांनी आपल्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निराकार ईश्वराकडे या उत्तम कार्यामध्ये यश मिळावे म्हणून प्रार्थना केली आणि आपापल्या निर्धारित ठिकाणी जाऊन सेवेला प्रारंभ केला. स्वच्छतेमधून जमा होणारा कचरा घेऊन जाण्याची उचित व्यवस्था स्थानिक महापालिका प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली होती. उल्लेखनीय आहे. की रविवारची सटटी असतानाही रुग्णालयांतील संबंधित अधिकारी तसेच महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी उपस्थित राहून हे अभियान यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. डोंबिवली येथील शास्त्री नगर महापालिका रुग्णालयाचे डॉसंजय जाधव तसेच उल्हासनगर येथे डॉ. आशीष जुमडे आणि डॉमधुरा देशपांडे यांनी या स्वच्छता अभियानाला सदिच्छा भेट देऊन अभियानाचे कौतक केले. ज्ञात असावे. की मिशनच्या वतीने वर्ष २००३ पासून बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेतसन २०१० पासून मिशनच्या वतीने देशभरातील ऐतिहासिक स्मारके, सागर किनारे, पिनार, नद्यांचे काठ, इस्पितळेसार्वजनिक स्थळे, रेल्वे स्थानके, पर्वतीय पर्यटन स्थळे इत्यादींची साफसफाई करण्यासाठी स्वच्छता अभियाने राबविण्यात येत आहेत. एका बाजला मिशनच्या या अभियानांचे जनसामान्यांकडन कौतक करण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजुला भारत सरकारनेही मिशनच्या कार्याची दखल घेऊन त्याला स्वच्छ भारत अभियानाचे बॅण्ड अॅम्बेसेडर घोषित केले आहे