अंबरनाथ, दि. ३ / प्रतिनिधी :- सध्या नगरपरिषदेत मनमानी कारभार सुरु असून, या मनमानी कारभारास सर्वसाधारण सभेत किंवा शासकीय स्तरावर विचारणारे कोणीही नसल्यामुळे ठेकेदारांच्या घशात लाखो-करोडो रुपये घालण्याचा घाट नगरपरिषद प्रशासन व काही राजकीय मंडळी करीत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या नगरपरिषदेत पाण्याचा टँकर बंद आहे. त्याचे दोन ड्रायव्हर, रुग्णवाहिका, वाहनांवरील चार ड्रायव्हर, त्याचबरोबर डम्परवरील दोन ड्रायव्हर असे जवळपास आठ ड्रायव्हर नगरपरिषदेच्या हजेरी बुकावर आहेत. आठ ड्रायव्हर असतानाही गेल्या दोन-तीन वर्षांपासून अंबरनाथ नगरपरिषदेच्या बिनडोक प्रशासनाने चार ड्रायव्हर हे कॉन्ट्रैक्ट पध्दतीने घेतले असूनहे अनट्रेन ड्रायव्हर चक्क अग्नीशामक दलाच्या गाडीवर सध्या कार्यरत आहेत. या छुप्यागोष्टीकडे कोणाचेही लक्ष जात नाही. या अग्नीशामक दलावर ट्रेन असणाऱ्या ड्रायव्हरला मुद्दाम जाणुनबुजून इतरत्र बदली करण्यात आली आहे. आणि जे ड्रायव्हर ठेकेदारी पध्दतीवर आहेत, त्यांना मात्र अग्नीशामक दलाच्या गाडीवर जबाबदारी देण्यात आली. आता हे काम कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर आले आहे हे त्यांनाच ठावूक. परंतु अंबरनाथ नगरपरिषद अग्नीशमक दलाच्या गाडीवर ट्रेन ड्रायव्हर असताना त्यांची बदली का करण्यात आली? आणि नगरपरिषदेकडे हजेरीपटावर आठ ड्रायव्हर कार्यरत असताना ठेकेदारी पध्दतीने ड्रायव्हर घेणे का भाग पडले? याचे गणीत मात्र समजूत आले नाही. याचाच अर्थ असा, नगरपरिषदेतील लाखो रुपये प्रशासन जाणीवपूर्वक ठेकेदाराच्या घशात घालत आहे हे सिध्द होत आहे. या बरोबरच जवळपास १५ वाहने ही अंबरनाथ नगरपरिषद टेंडर न काढताच मुदतवाढ देवून कार्यरत आहेतएका गाडीवर नगरपरिषद २५ हजार रुपये बिल ठेकेदारास अदा करत असल्याचे समजते. तेव्हा १५ गाड्यांचे दर महिन्याचे बिल ३७,५०० रुपये अदा करीत असल्याची माहिती हाती आली आहे. तेव्हा दर वर्षाला ४,५००,००० रुपये बिल अंबरनाथ नगरपरिषद वाहन ठेकेदाराच्या घशात घालत आहे. दरवर्षी ४ कोटी ५०० हजाराच्या नव्या गाड्या किती येतील याचा विचार अंबरनाथकरांनी करावा. म्हणजे सध्या अंबरनाथ नगरपरिषद प्रशासन जनतेच्या पैशाची किती लूट करीत आहे याचा अंदाज आपल्यासमोर मांडण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र जवळपास ओव्हरटाइम,आगडम बागडम पकडून जवळपास ५ कोटी रुपये केवळ वाहन भाड्यापोटी नगरपरिषद ठेकेदाराला अदा करीत असल्याचे वास्तव समोर आले असून, यात कोणाचे किती हे आता निवडणूक काळात जाहीर केले जाईल, असे एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाने आम्हाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. तेव्हा अंबरनाथ नगरपरिषद कोणत्या मार्गाने, कुठे, कसा भ्रष्टाचार केला जातो याची माहितीच आता जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. याचा विचार आत सी.ओ. यांनी करु नये. कारण त्यांचेच काम सुरळीत सुरु आहेत. याची चौकशी मात्र आता अॅन्टीकरप्शन विभाग, ठाणे यांनी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पान २ वरुन... हेरिटेज
अंबरनाथ नगरपरिषदेच्या तिजोरीत कॉन्ट्रेक्ट पध्दतीच्या कर्मचायांचा व वाहनांचा वाढता भार