नाशिकची मातीच वेगळी.. ह्या नाशिकच्या मातीत, गोदामातेच्या पाण्यात व येथील थंड हवेत काय जादू आहे देव जाणे, अनेक जादुई, कर्तृत्ववान आणि देवासमान आदरणीय व्यक्तिमत्वांचा जन्म नाशिकचा आहे. त्यातच त्यांना प्रत्यक्ष भेटीचा, आशीर्वाद घेण्याचा प्रसंग हा माझ्या मनावर आजही कोरुन ठेवला गेला आहे. माझ्यासारखी भाग्यवान मीच असे आजही मला वाटते. तात्यासाहेब.. फक्त नाव उच्चारले तरी तमाम नाशिककरांच्या नजरेसमोर एक विनम्र, हसतमुख, सुसंस्कृत, अभिजात, बुद्धिमत्तेच्या तेजाने चकाकणारा तेज: पुंज चेहरा येतो. अतिशय निर्गवी स्वभाव असलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व. तात्यासाहेब म्हणजे नाशिकची शान, नाशिकचा अभिमान आणि संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर, प्रशंसक लाभलेले कवि कुसुमाग्रज उप वि.वा. शिरवाडकर, दादासाहेब फाळके, ना.सी. फडके, वीर सावरकर... एकापेक्षा एक उत्तुंग व्यक्तिमत्व... नाशिककर खरोखरच भाग्यवान आहेत. खरंच आमचे परमभाग्य की आम्हाला यातील बऱ्याच जणांना प्रत्यच भेटण्याचे, बघण्याचे सौभाग्य लाभले. त्यांचा सहवास, त्यांचे आशीर्वाद मिळाले हेही नसे थोडके. तात्यासाहेबांच्या अनेक कवितांनी आयुष्यात जगण्याचे बळ दिले. (पाठीवरती हात ठेवून... फक्त लढ म्हणा), सामाजिक भान दिले (कुंभमेळ्यावरील कविता), ऐतिहासिक जाणीव दिली (वेडात दौडले वीर मराठी सात), प्रेम करायला शिकवले, पृथ्वीचे प्रेमगीत इत्यादी.. थोडक्यात तात्यासाहेबांनी मराठी साहित्याबरोबरच आमचे जीवनही समृद्ध केले. आमच्या अगणित पिढ्या तात्यासाहेबांच्या ऋणात राहतील. नाशिकची मातीच वेगळी.. ह्या नाशिकच्या मातीत, गोदामातेच्या पाण्यात व येथील थंड हवेत काय जादू आहे देव जाणेअनेक जादुई, कर्तृत्ववान आणि देवासमान आदरणीय व्यक्तिमत्वांचा जन्म नाशिकचा आहे. त्यातच त्यांना प्रत्यक्ष भेटीचा, आशीर्वाद घेण्याचा प्रसंग हा माझ्या मनावर आजही कोरुन ठेवला गेला आहे. माझ्यासारखी भाग्यवान मीच असे आजही मला वाटते. मी खरंच नशीबवान आहे की, मला माझ्या लग्नासाठी तात्यासाहेबांचे आशीर्वाद मिळाले. दि. १६ ऑगस्ट १९९२ रोजी सकाळी तात्यासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण तात्यासाहेबांच्या निवासस्थानी जाण्याचे ठरले होते. प्रकृती अस्वास्थ्यामळे तात्यासाहेब लग्नाला येण्यास असमर्थ होतेमाझे वडील ईश्वर पांडुरंग पवार ज्यांना आम्ही आदराने दादा म्हणत असू, त्यांनी आम्हा सगळ्यांना सकाळी ९.०० वाजता तयार राहण्यास सांगितले होते. माझ्या तयारीसाठी माझ्याभोवती मावशीमामी उभ्या होत्या. साडी नेसवण्याचा कार्यक्रम सरु होताशाळेत व कॉलेजला ठराविक डे' सोडले तर साडी नेसणे माहितच नव्हते. विशेष दिवस असल्यामुळे छान तयारी सुरु होती. अशी नको, एवढा पदर नको असे सुरु होते. दादांनी दोन-तीन वेळा चला, आवरा लवकर..उशीर होतोय सांगून झाले होतेपुन्हा एकदा आवाज दिल्यावर माझ्या एक मामी म्हणाल्या कुठे जायचे आहे. त्यावर मी तारुण्यासुलभ सहजतेने त्यांना उत्तर दिले 'अरे. त्या बाबाजींना नाही का भेटायला जायचे?' आणि पुढच्याच क्षणी दादांचा आवाज हॉलमध्ये कडाडला. ताईसाहेब आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय याच भान ठेवा.. दादा रागावले. मला ताईसाहेब म्हणत... माझा थरकाप उडाला. मी जीभ चावून सॉरी म्हणाले. मावशी, म्हणाले. मावशी, माम्या पण घाबरल्या. जमेल तशी साडी लपेटून अक्षरश: पळतच हॉल गाठला आणि दादांना म्हणाले चला, मी तयार आहे. माझा हेत कदापिही तात्यासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता. किबहना मी प्रेमानेच त्यांना बाबाजी म्हणले होते, मला तशी सवय होती. मी दादांना पण कधी कधी प्रेमाने त्यांच्या अपरोक्ष बाबाजी म्हणत असे. पण दादांना तो शब्द अजिबात आवडलेला दिसला नाहीकारण कदाचित तात्यासाहेबांचे मोठेपण समजण्याइतपत गांभीर्य त्या वयात मला आलेले नव्हते आणि म्हणूनच दादांना मला माझ्या लग्नाच्या दिवशी रागवावे लागले होते... फक्त तात्यासाहेबांसाठी. आजही जेव्हा जेव्हा तात्यासाहेबांचा जन्मदिन जवळ येतो (जागतिक मराठी दिनतेव्हा या प्रसंगाची हमखास आठवण झाल्याशिवाय राहत नाही. -सगाता फुक ( ९४२०३६२१९५
तात्यासाहेब : एक आठवण