नव महाराष्ट्राच्या उभारणीसाठी वचनबद्ध

ठाणे दि. १ । जिमाका :- पाच दिवसांचा आठवडा ही मागणी मान्य झाल्याने शासकीय अधिकारी यांच्यामध्ये निर्माण झालेल्या नव्या उत्साहाचा व उर्जेचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासाची प्रतिमा उंचावण्यास करूया असे आवाहन ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने ठाणे जिल्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना करण्यात आले आहे. तसेच ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिवाजी पाटील यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जनतेचे सेवक या नात्याने नव महाराष्ट्राच्या उभारणीसाठी वचनबद्ध होण्याची शपथ दिली. यावेळी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पाच दिवसांचा आठवडा ही जिव्हाळ्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मान्य करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत दि२४ फेब्रुवारी रोजी शासन निर्गमित केला आहे.