दुसऱ्याचे दु:ख ते आपले दुःख समजून जगा।।

दुःख समजून कारण शेवट कुणालाच चुकला जाणार नाही. अहो हे सांगण्याची वेळ येवून ठेपली आहे. काही शांत बसतात तर काही नको ती बडबड करतात, तर काही हसतात. तर काही गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या बाबतीत अहो नात्यागोत्यातील मंडळी त्यांची उणीदुणी काढतात मात्र, त्यांना हे कळत नाही की आपणही उद्या जाणार आहोत आपल्या देखील जाण्यानंतर आपण आज जे काही बोलतो त्याची आठवण काढून आपल्यालाही वाईट बोलणार आहेत. दुःखात तरी चांगले बोला, सुखात भले अहो __ लक्ष्मण अभंगे उराशी आकस बाळगून जगा पण दुःखात तरी ते वर्तन दिसायला (साहित्यीक) नको. कसल्या संस्था, कसले पक्ष, कसले धर्म, अहो चागले २०० करा कर्म तोच खरा धर्म. तरुणपणानंतर म्हातारपण येतेच तेव्हा या लिखाणातून तरुणांना विनंती आहे बाबांनो प्रत्येक स्त्री मुलगी ही कुणाची तरी बहिण व मुलगी, पत्नी असते. आपल्याही घरात तेच दिसते. तेव्हा वाईट आपल्या हातून काही घडेल असे करु नका दुसऱ्याचे दु:ख ते आपले दुःख समजून जगा ही बंधूनी प्रार्थना. बाबांनी नाही कमवले काही। पण आपल्यासाठी कमवून ठेवलेले आयुष्यभर संपणार नाही. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, ज्योगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे, राजेंद्र गवई, श्यामजी गायकवाड, वामन मेश्राम, गंगाधर इंदिसे, बी. डी. बोरकर नका हट्टाला पेटू बसा तुम्ही एकत्रीत बसा जे जे स्वताच घर सोडून दुसऱ्याच घरात जावून बसले आहेत. त्या पक्षाचा झेंडा हातात धरुन त्यांनाही लाज वाटेल ते आपला निळा झेंडा हातात घेवून पुन्हा अहो घरात येतील तेव्हा आधी तुम्ही एकत्रीत बसा बुद्धी, शक्ती, युक्ती वाया घालवू नका. एक झाला नाहीत तर कधीच बाबांचं तर पिढ्यानपिढया बरबाद होतील म्हणजे ऐक्याची वाट पहातील पण बाबांच स्वप्न कधीच साकार होणार नाही म्हणून एक व्हा. दादांनो, दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या स्वताच्या घराचा विचार करा. कारण आज कुणीच ऐकायला तयार नाही. म्हणून अहो चांगल्या कामामध्ये नित्य अडथळा येई। कर्जत येथे बाबांच्या स्मारकाच्या जागेसाठी प्रयत्न करत असतताना त्या जागे संदर्भात जिल्हा स्तरावर विचार होवून देखील काहींनी अडथळा निर्माण केला आहे. याला कारण आपली बेकी। विरोधाला ना जुमानले बाबा त्यावेळी मागणी त्यांची फेटाळण्या कुणाची ना मागण्याही। कारण एकीच्या घोषणांचा तो एक सूर होता।। म्हणून एक व्हा. जयभिम.