- अंबरनाथ, दि. ३) प्रतिनिधी :- अंबरनाथ येथील आगामी अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून जो तो आपआपल्या परीने भावी नगरसेवकाचे बॅनर लावून मुंगेरीलाल के सपने' पाहात असले तरी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आगामी निवडणूकीसाठी महाविकास आघाडी असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेस आघाडी असो या मित्र पक्षांना घेवून निवडणूक लखविण्यासंदर्भात नुकतीच चर्चा व बैठक संपन्न झाली असून या बैठकीस माजी खासदार, व ठाणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस शहराध्यक्ष सदाशिव पाटील व बाळूमामा सुर्यराव, महिला अध्यक्ष पुनम शेलार, अजिजभाई शेख, कमलाकर सूर्यवंशी, साबेकाका, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, नगरसेविका वृषाली पाटील, विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड, सुनिल अहिरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली. या प्रसंगी माजी नगरसेवक, ख्वाजाभाई चौधरी, भटके विमुक्तांचे नेते कैलास भांडवलकर, बंजार समाजाचे नेते सुंदरलाल डांगे आदिमान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते व तमाम पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी निवडणूकीसाठीची चाचपणी बैठक संपन्न